Latest Marathi News

BREAKING NEWS

.तर तीन महिन्यांत महापालिका निवडणुका शक्य; भाजपा नेत्याचं मोठं विधान

0

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, औरंगाबाद तसेच इतर महानगर पालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत, आज राज्यातून कोरोना संसर्गाचा नायनाट झाला असला तरी अद्याप मनपा निवडणूक कद्धी होणार असा प्रश्न विरोधकांसह सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. तसेच ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. अशातच आता मनपा निवडणुकीसंदर्भात भाजपा नेत्याने मोठे विधान केले आहे.

दरम्यान राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका निवडणुकीबाबत भाजपचे नेते तथा सहकार मंत्री अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. “ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर तीन महिन्यांत याबाबत कोर्टाचा निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकाचा ओरॅशन मार्गी लागू शकतो असे सावे म्हणाले आहे.

दरम्यान ऑगस्ट २०२२ पासून ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तर सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने उशीर होत आहे. परिणामी राज्यातील महापालिका निवडणुकांना ब्रेक लागला आहे. तर सुनावणी कधी संपणार, यावर न्यायालयाचा निकाल कधी येणार यावर सर्व पुढील गोष्टी अवलंबून आहे.

याच पार्श्वभूमीवर निवडणुका पावसाळ्यानंतरच होईल असा अंदाज बांधला जात होता. तर यावर आता मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना, पुढील तीन महिन्यात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर निकाल येण्याची अपेक्षा वर्तवली आहे. तसेच न्यायालयाचा निकाल आल्यास त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा विषय मार्गी लागू शकेल, असेही सावे म्हणाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.