मुंबई : राज्यात शिंदे फडणीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असल्याचे चित्र दिसून आले होते अशातच माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघांचीही एकमेकांवर टीका सुरू आहे. राज्य सरकारविरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ. ठरवू काय होतं ते, असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून मी राजीनामा देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं प्रति आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुगंटीवार यांना दिलं आहे.
मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे. कुपरेज फुटबॉल ग्राउंड येथे हे आयोजन करणअयात आलं आहे. यावेळी रेफ्री आणि महिला कोचेसला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांना हे प्रति आव्हान दिलं
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर आताच राजीनामा देतो. चला तयारी आहे? असा सवाल करतानाच मुनगंटीवार यांचे सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला आता या टिके वरून आदित्य ठाकरे आणि सुधीर मनमंटीवार यांच्यात चांगले शाब्दिक युद्ध रंगलेले चित्र येणाऱ्या दिवसात पाहायला मिळणार आहे.