Latest Marathi News

BREAKING NEWS

‘टक्केवारीचं दुकान बंद होणार म्हणून…’, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

0

‘ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली आहे, त्यांना पहिल्यांदा दु:ख होत आहे की, काँक्रिटचे रस्ते केले तर पुढची 40 वर्ष डांबरी रस्ते करायचा विषयच येणार नाही. आपली दुकानदारी बंद होणार आहे. त्यामुळे त्यांची ओरड आहे, जनता त्यांनी उत्तर देईल, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना लगावला.

मुंबईमध्ये 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली आहे, त्यांना पहिल्यांदा दु:ख होत आहे की, काँक्रिटचे रस्ते केले तर पुढची 40 वर्ष डांबरी रस्ते करायचा विषयच येणार नाही.

दरवर्षी डांबरी रस्ते करायचे, मागे एकदा 2018 मध्ये चौकशी झाली त्यावेळी 300 रस्त्यांमध्ये लेव्हलच नव्हती. आपली दुकानदारी बंद करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे त्यांची ओरड आहे, जनता त्यांनी उत्तर देईल, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना लगावला हे लोक झोपेत बोलणार आहे.

मेट्रोचे भूमिपूजन हे पंतप्रधानांनी केलं होतं. आता त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. काँक्रिटचे रस्ते तेच म्हणताय आमच्या काळात झाले नाही, तुमच्या काळात होत आहे. एसटीपीच्या संदर्भात केंद्र सरकारकडून परवानग्या आणल्या तरीही आपली भ्रष्टाचार, टक्केवारी, ठरलेला असल्यामुळे टेंडर काढले नाही. आता आम्ही वर्क ऑर्डर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेनं हे वर्कऑर्डर दिले आहे. हे असते तर वर्कऑर्डर 15 वर्ष निघालेच नसते, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.