मुंबई | बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसु सोलगाव येथील परिस्थितीचा आढावा घेतला असून दुसरीकडे याला कारणीभूत ठरलेले उद्धव ठाकरे यांच्या दुप्पटी भूमिकेवर टीका होत आहे अशातच आता मनसेने सुद्धा याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.
मनसे उपाध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी या सर्व घडामोडीवर ट्विट करून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, उद्भवा अजब तुझे कारभार !!! मुख्यमंत्री म्हणून नाणार मधून हद्दपार झालेला रिफायनरी प्रकल्प बारसु सोलगावच्या माथी मारणारे, आज त्यांचेच अश्रु पुसायला निघालेत ? स्वताच्या स्वार्थासाठी किती अजून किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार ? असा सवालच सतीश नारकर यांनी उद्धव ठाकरेंसह कोकणातील उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना विचारला आहे.
मुख्यमंत्री पदावर असताना नाणार येथून बारसू येथे स्थलांतरित करून उद्धव ठाकरे यांनी आता बारसूच्या जनतेचा विश्वासघात केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच १२ जानेवारी २०२२ ला पत्र लिहिले होते. यात बारसुमध्ये १३०० एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे पत्र लिहिले होते. या पत्रात म्हटले होते कि, पर्यावरणचा ह्रास होणार नाही, राज्याचा जीडीपी वाढणार असे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहले होते. याच पत्राचा संदर्भात घेत विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.