जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा रद्द करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होता. आता मुक्ताईनगरमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे. शिवसेनेकडून शिंदे गटाला आता ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे.
जळगावमध्ये सभा घेण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा पवित्रा घेऊनही पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजर कैदेत ठेवून मुक्ताईनगरकडे जाण्यास रोखले होते. त्यामुळे मुक्ताईनगरची महाप्रबोधन सभा होऊ शकली नाही त्यामुळे आता मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचा ठाकरे गटाने निर्णय घेतला आहे.
सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगर मध्ये सभा होणार आहे. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होईल, ती कुठे आणि कधी होणार या सभेची तारीख त्यानुसार घोषित करण्यात येणार आहे असंही, संजय सावंत यांनी स्पष्ट केलं.