Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सुषमा अंधारे या तीन महिन्याचं बाळ, त्यांची ठाकरे कुटुंबावरील टीका सहन करणार नाही’

0

शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून ते तीन महिन्यांचे बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. चोपडा मतदार संघातील धानोरा गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांचे होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सुषमा अंधारे या तीन महिन्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्या आहेत. ते तीन महिन्याचं बाळ आहे असा टोला लगावला.

तसेच पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सुषमा अंधारे यांना बाई म्हणत, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत. त्याच्याही क्लिपा दाखवाव्यात, अन्यथा आम्ही आमच्यावर केलेल्या टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.