Latest Marathi News

BREAKING NEWS

हृदयविकाराच्या झटक्यावर मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी STEMI महाराष्ट्र कार्यक्रम प्रभावी

0

#महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू केलेल्या STEMI (ST-Elevation Myocardial Infarction) कार्यक्रमामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा वेळीच शोध घेऊन गरजू रुग्णांना तातडीने मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारख्या अत्याधुनिक उपचार सेवा मिळवून देणे शक्य झाले आहे.

कार्यक्रमाची #वैशिष्ट्ये आणि मोफत सेवा

या कार्यक्रमाद्वारे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये क्लाउड-कनेक्टेड 12-लीड ईसीजी उपकरणांचा वापर करून STEMI निदान केले जाते. निदान झालेल्या रुग्णांना तातडीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या खाजगी कॅथलॅब रुग्णालयात हलवले जाते. अशा रुग्णांना पुढील उपचार, ज्यामध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यासारख्या प्रक्रिया मोफत केल्या जातात.

#बार्शीतील सेवा आणि यशस्वी रुग्णसेवा

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बार्शी हे या भागातील हब केंद्र असून येथे गेल्या दोन-तीन महिन्यांत STEMI निदान झालेल्या 8 ते 10 रुग्णांवर, तसेच 1588 इतर हृदयविकार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. STEMI निदान झालेल्या रुग्णांसाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारख्या मोफत उपचार सेवांचा लाभ दिला जातो.

तज्ञ #डॉक्टरांची उपस्थिती:

डॉ. विकास खामकर (पूर्णवेळ)

नियोजित वेळेसाठी: डॉ. सुनील शेवाळे, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. हेमंत कोकणे

सरकारी आरोग्य केंद्रांतील अतिरिक्त सेवा

सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विना-संसर्गजन्य आजार (जसे की शुगर, डायबिटीस, हायपरटेन्शन) तपासण्यासाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हृदयविकाराचे निदान वेळीच होऊन STEMI रुग्णांना पुढील उपचारासाठी तातडीने हलवले जाते.

#जनहितार्थ आवाहन

जर हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे जाणवत असतील किंवा ईसीजी तपासणी गरजेची असेल, तर जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा. STEMI निदान झाल्यास, सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बार्शी येथे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसह पुढील उपचार पूर्णपणे मोफत केले जातील.

#हृदयविकार उपचारात STEMI महाराष्ट्र कार्यक्रम एक महत्त्वाची क्रांती ठरली आहे. रुग्णांनी वेळ न घालवता या मोफत सेवेचा लाभ घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.