Latest Marathi News

BREAKING NEWS

राहुल पालके यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0

बार्शी : प्रतिनिधी
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री राहुल भगवान पालके यांना ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सोलापूर जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण बार्शी येथे
होणार आहे. राहुल पालके यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन करण्याबरोबरच विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. नेट व सेट या परीक्षा एकूण १४ वेळा इंग्रजी, मराठी व वुमन स्टडीज या विषयांत उत्तीर्ण केलेल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्येही त्यांनी यश मिळविलेले होते. ते कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करतात.त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यामध्ये बार्शी व आजूबाजूच्या परिसराचे प्रतिबिंब उमटलेले आहे. अखिल भारतीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व बार्शी इ. ठिकाणी त्यांनी आपल्या कवितांचे वाचन केलेले आहे. विविध विषयांवर व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. त्यांना वाङ्मयीन स्पर्धामध्ये महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन नाशिकची पारितोषिक प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी वाड्.मय व स्प स्पर्धांमध्ये तसेच योगा,क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष यश मिळविले होते. अलीकडेच त्यांना २० व्या युवा महोत्सवात उत्कृष्ट संघव्यवस्थापक म्हणूनही संयुक्त प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.