मोडनिंब (ता.माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेस शनिवार (दि. १०) मे पासून प्रारंभ होत आहे. श्री वेताळ देवस्थान यात्रेनिमित्त वेताळ देवस्थान कडून सलग सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे यांनी दिली. प्रारंभी शनिवारी (दि.१०) ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनाने यात्रेतील कार्यक्रमांना सुरुवात होईल. रविवारी (दि. ११) रोजी रोजी सकाळी नृसिंह जयंतीनिमित्त महाभिषेक होऊन दुपारी चार वाजता वेताळ देवस्थानाकडे तोरण्या नेल्या जातील. संध्याकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ह.भ.प. शिवलीला पाटील यांचा कीर्तन सोहळा संपन्न होईल. सोमवारी (दि. १२) रोजी पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक सोहळा, संध्याकाळी श्रींचा छबिना व भाकणूक, सोंगाच्या गाड्या (पौराणिक) व त्यानंतर शोभेचे दारुकाम होईल. मंगळवारी (दि. १३) सकाळी श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक, भेदी गाणी व कलगीतुरा, संध्याकाळी सोंगाच्या गाड्या, शोभेचे दारुकाम व त्यानंतर वैभव म्युझिकल नाईट, कोल्हापूर यांचा “माहेराला ये ग माझ्या बहिणी” या नाटकाचा प्रयोग होईल. बुधवारी (दि. १४) दुपारी पाच वाजता जंगी कुस्ती मैदान, संध्याकाळी सोंगाच्या गाड्या (आधुनिक), संध्याकाळी नऊ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत बारा गावाच्या बारा अप्सरा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. गुरुवारी (दि. १५) संध्याकाळी नऊ वाजता गुणवंतांचा सत्कार समारंभ व ऑर्केस्ट्रा होईल. यात्रेनिमित्त दररोज सर्व भाविकांसाठी राजवाडा हॉलमध्ये महाप्रसाद देण्यात येणार आहे.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे, उपाध्यक्ष संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, प्रकाश गिड्डे, सदस्य बालाजी पाटील, नागनाथ माने, शिवाजी उर्फ बच्चू गोरे, राजेश निंबाळकर,हनुमंत यादव, नाना बिनगे, सुरेश साळुंखे, युवराज पवार, प्रकाश कोळी, सचिन खरात, रत्नदीप गुरव, चंदन गुरव, उज्वल गुरव, बाळू जाडकर, काका हागे, संभाजी काळे, सोमनाथ शिंदे, अनिल पाटील, नंदकुमार लादे, सचिन सोमासे, प्रकाश डोंगरे, सौदागर शिंदे, सत्यवान बिनगे, बाळासाहेब माने, अरविंद कुंभार, उदय जाधव, दिलीप खडके, गणेश कुंभार, अनिल खडके, शिवाजी लोखंडे, पौपट कोळी, बंडू व्यवहारे, सागर सुर्वे, राजेंद्र खडके यांच्यासह सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट