घटनेने महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ
सोलापूर, दि १८ मेंदूरोग क्षेत्रात आपल्या गुणवत्ता आणि नैपुण्याने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक संपादन करणारे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज सायंकाळी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.एक सुस्वभावी, लोकप्रिय आणि डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.या घटनेच्या वृत्ताने सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक अशी प्रतिक्रिया उमटली तर राज्याचे वैद्यकीय क्षेत्र हळहळले.