Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदेंच्या आमदाराला मनसेचं आवाहन, थेट राज ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा !

0

मंडणगड | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून चिपळून, खेड, दापोलीनंतर आज त्यांनी मंडणगड येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच पुढच्या दौऱ्यावेळी मंडणगड येथे कार्यकर्त्याच्या घरी जेवणार असल्याचे विधान केले मात्र तो कार्यकर्त्या किंवा पदाधिकारी कोण ? हे नाव मात्र त्यांनी गुपित ठेवले.

यावेळी राज ठाकरेंनी थेट दापोली-खेड-मंडणगड विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिले तसेच या मतदार संघाची जबाबदारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर सोपवली या घोषणेमुळे येणाऱ्या काळात शिंदे आणि मनसे युती होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे कारण या मतदार संघावर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे सुपुत्र आणि योगेश कदम हे आमदार आहेत.

तसेच हा मतदार संघ शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आता याच मतदार संघात मनसे उमेदवार देणार असल्याचे संकेत खुद्ध राज ठाकरे यांनी दिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या मतदार संघात परस्पर निवडणूक लढवणार असे संकेत मिळत आहे आता राज ठाकरे यांच्या या विधानावर रामदास कदम तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.