Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवशक्ती-भीमशक्ती हीच खरी महाशक्ती ; संजय राऊत म्हणाले

0

मुंबई | शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने याबाबत संकेत देण्यात आले आहे. आज दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एक पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. यावर आता शिवसेना खासदार संकटी राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रात आज क्रांतिकारक घटना घडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्ष प्रमुख (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र येणार आहेत. ही फक्त सुरुवात असून महाराष्ट्रात अजून बरेच काही घडणार आहे.” असे ते म्हणाले.

ही फक्त दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती-भीमशक्तीची आणि विचारांची युती आहे. दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात, हे बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न होते. आमच्यामागे महाशक्ती असल्याचे कुणाला वाटत असेल, तर त्यात काही तथ्य नाही. ठाकरे-आंबेडकर यांच्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.