Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेमध्ये बंड होणार असल्याचं पूर्वीपासूनच माहिती होतं पण..; उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांचा मोठा गौप्यस्फोट

0

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ४० आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाच्या मदतीने शिंदे यांनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तर त्या पाठोपाठ १२ आमदारांनी सुद्धा शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला अशातच आता उद्धव ठाकरे गटासोबत राहिलेल्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेमध्येहोणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा मोठा गौप्यस्फोटशिवसेनाठाकरे गटाचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.

मात्र सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आम्ही आणि आमदार कैलास पाटील यांनी ठरवलं होतं. आम्ही सत्तेसाठी गद्दारी केली नाही. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेमुळं पद मिळालं मान, सन्मान मिळाल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ते शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेतील बंडाची कुणकुण होती. मात्र आम्ही सत्तेसाठी गद्दारी केली नाही. सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आमचं आणि कैलास पाटील यांचं ठरलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळं पद मिळालं सन्मान मिळाला असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.