पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट विरोधकांना इशारा दिला आहे 2024 ला शिवसेनेची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत थेट विरोधकांना इशारा दिला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, जी कारवाई करायची ती आत्ताच करा. आमची सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. संजय राऊतांनी आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार टीका केली.
दोन वर्षापूर्वी ट्रम्प गुजरातला आले तेव्हा कोरोनाचा कहर होता. तेव्हा कोरोना नव्हता का? गुजरातमध्ये मतदानाच्या शेवटपर्यंत रोड शो चालू होते. तेव्हा कोविडची भीती नव्हती का? असा सवाल राऊतांनी केला. भारत जोडो यात्रेला जे समर्थन मिळत आहे. लोकांची जी गर्दी होत आहे. भारत जोडो यात्रेमुळं नफरत विरुध्द प्रेम हा सामना सुरु झाला आहे. लोकांच्या मनापर्यंत प्रेम पोहोचलं आहे. त्याचं काही लोकांना कोरोनापेक्षा जास्त भय असल्याचं राऊत म्हणाले.
जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे असतात. गेलेले आमदारही माझ्या जवळचे होतो. एकनाथ शिंदे, दादा भुसे, उदय सामंत हे जवळचे होते असे राऊत म्हणाले. संकटाच्या काळाज जे पक्षासोबत असतात तेच खरे जवळचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. पळपुटे येतात आणि जातात. आज इथे उद्या तिथे असे म्हणत राऊतांनी शिंदे गटातील आमदारंवर टीका केली. हे कोणी लोकनेते नव्हते, पक्षानी त्यांना मोठे केले होते असेही राऊत म्हणाले