Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेना आमदार संजय शिरसाट विरोधात सुषमा अंधारे आक्रमक

0

उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढत असल्याचे चित्र डोसून येत आहे अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात केलेल्या टिपण्णीमुळे पुन्हा या दोन्ही गटात वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, . दरम्यान आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

याप्रकरणी सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे सुषमा अंधारे या त्यांच्या अनेक सभेतून विरोधकांवर जहरी टीका करत असतात. अनेक भाषणात त्यांनी आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. त्यावरुन संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली. या वक्तव्यामुळे आता संजय शिरसाट अचडणीत येण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे आणि जोपर्यंत शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. शिवसेनेत आमचं आयुष्य गेलं आहे. आम्ही शिवसेनेत अनेक वर्ष घालवली आहेत आणि आता नवीन आलेले लोक आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’ असे शिरसाट म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.