Latest Marathi News

BREAKING NEWS

भविष्यात निवडणुक लढेल की नाही माहिती नाही, शिवाजिदादांची मतदारांना भावनिक साद

0

महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.

एका सभेत आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.

पुढे बोलतांना ते असेही म्हटले की, भविष्यात निवडणूक लढेल की नाही लढेल काही सांगता येत नाही. पण यावेळेला संधी द्या. आपल्या भागात जी कामं अपुर्ण राहिली ती पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही शिवरायांची भूमी आहे. क्रांतीकारांची भूमी आहे. ही शूरवीरांची भूमी आहे.  या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचे काय ऐकत नाही. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह घड्याळ आहे.  घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.