एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अशातच शिंदे गटावर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. यातच शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी “स्वतः दहावी दोनदा नापास…” असं म्हणत विनायक राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “खासदार विनायक राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वतः दहावी दोनदा नापास. जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2022
विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे असे आव्हानही दिले आहे.