Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय | नुकसान 50 हजारांचं अन् शेतकऱ्याला दिला फक्त 60 रुपये पिकविमा

0

अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. अजूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत पोहोचली नाही.अशातच विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. अवघ्या 60 रुपयांची परतावा रक्कम देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. यासाठीच विमा रक्कम भरली होती का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थिती केला आहे.

मोहाडी येथील शेतकरी विश्वास पाटील यांच्यासोबत हा किस्सा घडला आहे. त्यांची मोहाडी येथे 3 एकर शेती आहे. त्यांनी खरीप हंगामात भात पिक लावले होते. यासाठी त्यांना 50 हजार रुपये खर्च आला होता.दरम्यान जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तिनदा अतिवृष्टी झाली. त्यात त्यांचे धान पिक पूर्णपुणे पाण्यात बुडाले. सतत पाण्यात राहिल्याने धान पिक करपले. तलाठीमार्फत पंचनामे झाले.

आता नुकसान भरपाई म्हणून काढलेला पिक विमा कामात येईल असे पाटील यांना वाटत असतांना त्यांना 60 रुपये पिक विम्याची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला, व त्यांच्या पाया खालील वाळू सरकली. पिक विमा काढण्यासाठी रक्कम म्हणून 820 रुपये लागले आणि नुकसानी भरपाई परतावा केवळ 60 रुपये भेटल्यांने ही अशी कशी विम्याद्वारे मदत असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता ती रक्कम परत सरकारला पाठवणार असल्याचे पाटील म्हणत आहे. त्यामुळे खरंच पिक विमा काढून फायदा मिळतोय का असा सवाल त्यांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.