Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाला कोकणात धक्का, कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात पतरले

0

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या कणकवली तालुक्यात रोज विविध राजकीय पक्षाकडून नेते व कार्यकर्त्यांच्या पक्षांतरच्या बातम्या सतत पुढे येत आहेत.काल खारेपाटणमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या दोन युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत व जिल्हा युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार सुधीर सावंत व किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात खारेपाटण येथील युवा सेनेचे कार्यकर्ते प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पक्षप्रवेश हा काही औटघटकेचाच ठरला.

खारेपाटण शिवसेना शाखा कार्यलयात शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शैलेश भोगले व कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी शिवसेना पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला. यामुळे शिंदे गटाकडे गेलेले शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आता हळूहळू स्वगृही परत येऊ लागले आहेत. त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.