ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याच्या मुद्यावरुन विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी फ्रप ही एका टप्प्यातच देण्यात यावी अशी भूमिका मांडली आहे. तत्कालीन महाविकस आघाडी सरकारच्या काळात दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, याबाबत बदल करुन शेतकऱ्यांना 14 दिवसात उसाची FRP मिळावी, यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळावी, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या 1966 च्या शुगर केन कंट्रोलनुसार महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे बील एकरकमी 14 दिवसांच्या आत मिळते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनं यामध्ये बदल होता. या सरकारनं दोन टप्प्यात FRP द्यावी असा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणार असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे.
तसेच हा निर्णय शेतकऱ्यांची घडी विस्कटून टाकणारा आहे. एकरकमी उसाचे बील मिळाल्यास शेतकऱ्यांना सोसायटी आणि बँकांचे कर्ज फेडूननवीन उचल ताबडतोब मिळते. जोन टप्प्यात बिल मिळाल्यास शेतकऱ्यांची कर्जफेड लांबणीवर पडून त्याचा नवीन लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. रयत क्रांती संघटनेनं एकरकमी FRP बाबत कायमच आग्रह धरला असल्याचे खोत यांनी म्हटलं आहे.