Latest Marathi News

BREAKING NEWS

शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब; शिंदे गटाचे खासदार नाराज?

0

 

जैल महिन्यात राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. यातून सावरत असताना पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

तसेच काही जिल्ह्यात मदत मिळाली ती मदत झालेल्या नुकसानाच्या तुलनेत अतिशय तोकडी असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत कृपाल तुमाने हे लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होत असल्याने शिंदे गटाचे खासदार नाराज असल्याची बातमी देखील समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.

तसेच नुकसानाचे पंचनामे पूर्ण होण्यास वेळ लागेल. पंचनामे पूर्ण होईपर्यंत मदत मिळणार नाही. अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार तुमाने यांनी केली आहे. याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.