मोदी आडनावासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली तसेच या शिक्षेस पात्र ठरलेल्या राहुल ग्नादी यांची खासदारकी सुद्धा रद्द करून काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. यानंतर, घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत, मी माफी मागायला मी सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कुणाचीही माफी मागत नाहीत, असे म्हटले होते.
राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांवर केलेल्या टिकेनानतंर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते अशातच आता भाजप-शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) स्वातंत्रवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ “सावरकर गौरव यात्रा” काढली आहे. या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवरही घणाघाती टीका केली.
फडणवीस म्हणाले, “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, ते सावरकरांना माफीवीर म्हणतात. अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण त्यांची तेवडीही पात्रता नाही, जे स्वातंत्रवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचे नाव सांगता, त्या पक्षाच्यान नेत्यांनी इंदिरा गांधींचा गौरव केला, यशवंत राव चव्हानांनी त्यांचा गौरव केला आणि तुम्ही कुठले काल आलेले स्वातंत्रवीर सावरकरांना माफीवीर म्हणता.
पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैव एका गोष्टीचं आहे की, ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसलेले आहेत. खरे तर, ही एवढी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. पण हे (उद्धव ठाकरे) त्यांचा निषेध करू शकले नाहीत अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.