मुंबई |
आंध्रप्रदेश मेडटेक झोन लि. (एएमटीझेड) च्या धर्तीवर नागपुरातही वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन झोन तयार करणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करा, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
पत्रात गडकरी म्हणतात, एएमटीझेड ही मेडिकल टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेली सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. मी स्वतः काही दिवसांपूर्वी एएमटीझेडच्या विशाखापट्टणम् येथील केंद्राला भेट दिली. अशाप्रकारचे केंद्र महाराष्ट्रात असायला हवे. एएमटीझेडने इतर राज्यांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्याच्या अनुषंगाने एक प्रस्ताव मांडला आहे.