Latest Marathi News

BREAKING NEWS

कमवा आणि शिका’ या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष… या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर, ०२ मे : मुलींच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. याचा राज्यभरातील मुलींना मोठा फायदा होत आहे. मात्र, आर्थिक दुर्बल मुलींना इतर खर्चासाठी कुटुंबावर अवलंबून रहावे लागते. यावर उपाय म्हणून, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून ‘कमवा आणि शिका’ ही योजना मुलींसाठी देखील अंमलात आणण्यासाठी राधानगरी तालुक्यातील वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीच्या जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून; याचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेच्या या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटत असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. भविष्यात हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील यांनी संस्थेची पाहणी केली. तसेच सर्व पदाधिकार्त्यांकडून माहिती देखील घेतली.

कमवा व शिकवा ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता. या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत असून आपले शिक्षण पूर्ण करत असत.

Leave A Reply

Your email address will not be published.