Latest Marathi News

BREAKING NEWS

मंत्र्यांसमोर पेट्रोल अंगावर ओतुन घेत शेतकऱ्याचे आत्मदहन.. नाशिक मध्ये घडला धक्कादायक प्रकार… 

0

नाशिक : ‘आता जगून फायदा काय… कांद्याचे नुकसान झाले… सगळं वाटोळं झालं, असं म्हणत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. राज्यात सध्या आवकाळी पाऊस सुरु आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करत होता आता पुन्हा एक संकट कोसळले. दुष्काळातून मार्ग काढत कसेबसे वाढवलेले पीक ऐन काढणीला आल्यावर अवकाळी पावसाने ते हिरावले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री पाहणी दौऱ्यासाठी आल्या असता, त्यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. अचानक झालेल्या या सर्व गोष्टीमुळे डॉ. भारती पवार या देखील अचंबित झाल्या. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्याचे झाले असे की, अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर गेल्या होत्या. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी त्या तळेगाव रोही येथे पोहोचल्या. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तळेगाव रोही व परिसरात गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती, त्यात पाणी विकत आणून कांदे व फळबागा जगविल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याच उद्विग्नतेतून तळेगाव रोही येथील रामदास लक्ष्मण केदारे या शेतकऱ्याने केंद्रीय मंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

संतप्त शेतकऱ्यांने व्यक्त केली खंत

तळेगाव रोही येथे रामदास लक्ष्मण केदारे यांचे दोन एकर कांद्याचे पीक होते. कांद्याचे पीक पाणी कमी असल्याने त्यांनी टँकरने पाणी विकत आणून जगविले. त्यासाठी त्यांनी कर्ज काढून हजारो रुपये खर्च केले होते. मात्र, गारपिटीने त्यांच्या कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले. त्यामुळे “आता जगून काय करणार, मी यावर्षी घरी दिवाळीही नाही केली. मी हजार रुपये टँकरने 52 टँकर पाणी आणून कांदा जगविला. आता कांद्याचे नुकसान झाल्याने कर्ज फेडू तरी कसे, मग मेलेले बरे. सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानीची मदत करावी व संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी या वेळी रामदास केदारे या शेतकऱ्याने केली

Leave A Reply

Your email address will not be published.