Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्रपट सृष्टीत शोककळा। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

0

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. मागच्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. 2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचं निधन झालं होतं.

रमेश देव यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती.

या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

‘मोदींची ताकद वाढवण्यासाठी तिकडे गेले मग मुश्रीफ साहेब शरद पवारांची ताकद का वाढवली नाही’

शरद पवारांच्या सभेला मोठी गर्दी झाली पाहिजे; चक्क अजित पवार गटाचे आदेश

Leave A Reply

Your email address will not be published.