Latest Marathi News

BREAKING NEWS

“सत्ताधाऱ्यांचा डोक्यात गांडूळाचा मेंदू, संयुक्त लढ्याची आठवण” राऊतांचा मोर्चापूर्वी सत्ताधाऱ्यांवर निशाणा

0

महापुरूषांच्या अवमानाविरोधात आज महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. त्याआधी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महामोर्चामुळे सरकारचे पाय लटलट कापत आहेत. म्हणून मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी महामोर्चा त्यालाही सरकार बंधनं घालतं, हे योग्य नाही. महापुरूषांविषयी यांच्या मनात किती आदर आहे हे स्पष्ट होतं”, अस म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

आज महाविकास आघाडी महामोर्चा काढत आहे. या महामोर्चात संजय राऊत सहभागी होणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्या गळ्यात भगवा मफलर होता. जोडीला निळं उपरणं, डोक्यावर निळी पगडीही पाहायला मिळाली. ‘महामोर्चा’साठी संजय राऊत यांनी हा खास लूक केला आहे. ताईच या मोर्चाला शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षाचे कार्यकर्ते सामील होणार आहेत.

सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील तर त्यांनी मोर्चात सामील व्हावं. त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्यात दबलं गेलं. चिरडलं गेलंय, अशी टीका करतानाच आजचा मोर्चा प्रचंड आणि अतिविराट असाच निघेल, असं म्हणत राऊतांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.