ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील मंत्रिपदावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार कोसळेल, असे भाकीतही अंधारेंनी केले आहे.कामाला लागा ! २०२३ मध्ये निवडणुका लागणार म्हणजे लागणार, भाजपामुळेच हे सरकार कोसळेल, असेही त्या म्हणाल्या आहेत.राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. इतक्या मोठ्या पदावर असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचा माईक काढून घेतात, म्हणत अंधारेंनी शिंदेंची खिल्ली उडवली.
आमच्या एकनाथ भाऊंकडे मंत्रीपद नाही का? आमचे भाऊ तर मुख्यमंत्री आहेत, त्यांचा नाद करायचा नाही. परंतू ते कसे मुख्यमंत्री आहेत? आमच्या भाऊंनी कोणत्याही फाईलवर सही करायची ठरवली, तर ती फाईल देवेंद्र फडणवीसांकडे जाते, असा टोला अंधारे यांनी लगावला. ज्या ठिकाणी लोकांचा संताप अंगावर येऊ शकतो, ती खाती एकनाथ शिंदेंकडे आहेत. यामागे भाजपा आणि टीम देवेंद्रकडून हे ठरवून केलेले षडयंत्र आणि रणनिती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्या ठिकाणी लोकांचा संताप अंगावर येऊ शकतो, ती खाती एकनाथ शिंदेंकडे आहेत. यामागे भाजपचे षडयंत्र आणि रणनिती असल्याचा आरोपही त्यांनी केला.राज्यात शिंदे- भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली. यातील मलिद्याची खाती फडणवीसांकडे असल्याचे सांगून अंधारे यांनी टीकास्र सोडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॉबिनहुड आहेत का? असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.