औरंगाबाद | वाढदिवसाच्या जीवनाचे पैसे मागितल्यामुळे धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची केटरर्स मालकाला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव आहोत असं करणे योग्य नाही’ असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाला सल्ला दिला.
शिंदेऔरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने एका केटरर्सला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावर गुलाबराव पाटील याांनी प्रतिक्रिया दिली. ‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव असून असं करणं योग्य नाही आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व या क्लिप मधून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता मात्र खरच त्यांनी असं केलं असेल तर त्यांची समज देवू असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
‘पक्षातीलच काही आपल्याबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मागच्या सरकारमध्ये धुसफुस नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अडीच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्यात धुसफुस होती म्हणून तर गुवाहाटीला गेलो, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या लोकसभा मिशन बाबत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत भाजपाचे मिशन आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर भाजपच्या लोकसभा मिशन वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. ‘संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी’ अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली आहे.