Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भरला दम म्हणाले की,

0

‘सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. शिवसेनेकडून धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय’, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई यांना दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू.

106 हुतात्म दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगो. शिवसेनेकडून धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. 40 आमदारांचा गट आहे. स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडला, आता कुठे गेलं तुमचं स्वाभिमान, कुठे शेण खात आहे. एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही, अशी तिखट टीकाही राऊत यांनी शिंदेंवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.