Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, त्यांच्या समर्थकांनी केक कापत जोरदार वाढदिवस साजरा केला आहे. राजकीय पक्षातील सर्व नेत्यांनीही शिंदे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहे. अशातच शिवसेनेचे खासदार ( उद्धव ठाकरे गट ) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता या दिलेल्या शुभेच्छामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चला सुरवात झाली आहे.

’माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतोच आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे.’ असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

दरम्यान,बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.