Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत यांच्याकडून शिवसैनिकांना आवाहन; ट्विटमध्ये शरद पवारांना केलं टॅग

0

राज्यात सत्तांतराचे महानाट्य सुरु असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीची चौकशीसाठी नोटीस आली. ईडीची नोटीसीनंतर राऊत यांनी राज्याच्या राजकारणाबाबत आणखी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती. यानंतर राऊत यांनी थेट शरद पवार,ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींना टॅग करत एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपण तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच आज १२ वाजता ईडी समोर हजर होणार असल्याचे देखील राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. मला जारी करण्यात आलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो. काळजी करू नका म्हणत राऊत यांनी थेट ममता बॅनर्जी, राहुल गांधी यांच्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने राऊत यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलै रोजी राऊत ईडी कार्यालयात दुपारच्या सुमारास जाणार आहेत. शिंदे गट शिवसेनेपासून विभक्त झाल्यानंतर राज्यात सुरु असलेल्या गोंधळामध्ये राऊतांना ईडीची नोटीस आली होती. त्यांनतर आता राऊत यांनी शरद पवारांसह ममता बॅनर्जींना टॅग करत ट्विट केल्याचे पहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.