महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला झाला. या हल्यात तीन ते चार लोकांनी मास्क घालून रॉडच्या साहाय्याने देशपांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी मनसेचे उपाध्यक्ष व टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांनी ट्विट करून मुंबई पोलीस प्रशानाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या हल्ल्याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.
ते आपल्या तवीमध्ये म्हणतायत की, माझे सहकारी आणि मित्र संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मॉर्निंगवॉकला गेलेले असताना हल्ला झाल्याचे वृत्त समजले. देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय असून या हल्लाखोरांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जेरबंद करून या मागचा मास्टरमाईंड कोण ? हे शोधून काढावे ! असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. या प्रकरणात कोणीतरी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय मनसे नेत्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये नेहमीप्रमाणे आज संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.