Latest Marathi News

BREAKING NEWS

राऊत तुरूंगातून बाहेर पण ठाकरे गटाचा हा बडा नेता मात्र संकटात ?

0

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा जामिन कोर्टाने मंजूर केल्याने शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्साह आहे; परंतु दुसरीकडे शिवसेनेचा एक खंदा शिलेदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात माजी मंत्री अनिल परब यांना समन्स बजावले आहे आणि १४ डिसेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. भाजप नेत्यांची मिंधे गटाला हाताशी धरून शिवसेनेच्या नेत्यांवर आगपाखड सुरू असतानाच आता शिवसेना नेते अनिल परब त्यांच्या बाबतीत २४ तासात परस्परविरोधी घटना घडत आहेत.

माहितीनुसार, रत्नागिरी- मुरूडमधील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी दापोली न्यालायलाने अनिल परब यांच्यासह तिघांना समन्स बजावले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ अन्वये अनिल परब यांच्यावर समन्स बजावण्यात आले आहे. त्यानंतर १४ डिसेंबरच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही दापोली कोर्टाने दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या दाखल केलेल्या खटल्यावर काल (९ नोव्हेंबर) दापोली कोर्टात सुनावणी झाली.

यावेळी पर्यावरणसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हा खटला दाखल केला आहे. वकील प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्या वतीने युक्तीवाद केला. युक्तीवादानंतर न्यायालयाने समन्स बजावले आहे. दरम्यान, एकीकडे खेड न्यायालयाने अंतिम जामिन मंजूर केला असताना आता दापोली न्यायालयाने समन्स बजावला. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांच्या मागे भाजपची कुटनीती सुरू असताना आता दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी पोलिसांनी हा एफआयआर दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.