Latest Marathi News

BREAKING NEWS

दोषी बी –बियाणे, खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करून फौजदारी खटले दाखल करा

0

सोलापूर |

जिल्ह्यातील उशिरा आणि कमी पावसाने हवालदिल शेतकरी त्रस्त आहे. खरिपातील पिकांसाठी शेतीची मशागत करून पेरणीसाठी शेती तयार करण्यात मश्गुल आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने नुकसान आणि कर्जाच्या ओझ्याखाली चिंतीत शेतकरी यावर्षी चांगल्या उत्पादनाच्या आशेने खरिपाच्या मशागती करून पेरण्यासाठी उत्तम व चांगल्या दर्जाचे बियाण्यांच्या खरेदीसाठी शहरातील आणि जवळच्या विक्रत्यांकडे फेऱ्याही चालू केलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने महाबीज माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कमी दरात पेरणीसाठी अनुदान स्वरूपातून कमी दरात सर्व बियाणे विक्रेत्यांकडे बियाणे कमी दरात विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. असे असतानाही काही बी बियाणे विक्रेते अनुदानित बियाणे परमिटधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याऐवजी शेतकऱ्यांची इतर महागडे बियाणे विक्रीसाठी ना-ना कारणे सांगत अडवणूक करत बियाणे माथी मारत असल्याचे निदर्शनास आले आहे. गरजू परमिटधारकशेतकऱ्यांना प्राधान्याने महाबीजचे अनुदानित बियाणे विक्री करणे गरजेचे असताना मस्तवाल विक्रेते स्वतःच्या फायद्यासाठी जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाराचाजणू बळीच घेत आहेत. दरवर्षी अनेक प्रकारच्या अडवणूक करत बी-बियाणे आणि खत विक्रेतेही शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक शोषण करत शेतकऱ्यांच्या जिवंतपणीच टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न आहेत. आपल्या विभागाकडून अशा विक्रेत्यांवर योग्य तो चाप नसल्याने विक्रेते परत तीच आपली मनमानी करत आहेत. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून दुसरीकडे विक्रेते आणि प्रशासनाचे साटेलोटे आहे कि काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

मी मारतो तू रडल्यासारखे कर हि प्रवृत्ती थांबविणे गरजेचे असून परमिटधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करूनदेण्याऐवजी शेतकऱ्यांची इतर महागडे बियाणे खरेदीसाठी प्रवृत्तकरणाऱ्या बी बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून संधितांवर योग्य ती कायदेशीर कडक करावी अन्यथा बळीराजासाठी संभाजी आरमार उग्र आंदोलन करेल याची गंभीर दखल घेण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद जगताप, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, प्रभाग प्रमुख द्वारकेश बबलादीकर, किरण ताकतोडे आदी जण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.