नमस्कार,
स्वात़ंत्र्या नंतरच्या मराठ्यांच्या अनेक पिढ्यांना देशमुखी, पाटीलकी आणि ९२-९६ कुळीच्या मानसिक चक्रव्यूहातून बाहेर पडूच दिले नाही.. मराठा पुढाऱ्यांनी मराठा समाजाला गृहित धरुनच सोशल इंजिनिअरिंग आणि पुरोगामी विचारांच्या नावाखाली मराठा समाजावरच अन्याय केला… अनेक पिढ्या अव्यवहारी शेती करण्यात खपल्या! प्रत्येक पिढी बरोबर शेतीचे तुकडे पडले.. असंख्य कुटुंबं शेतीचा तुकडा विकून शेतमजूर कधी बनले कळलेच नाही.. शिवरायांचा लढवय्या कुणबी मावळा कंगाल झाला.. महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८६९ मध्ये समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार मांडला.१९०२ साली राजर्षी शाहू महाराज छत्रपतींनी मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटने द्वारे आरक्षणाचा हक्क दिला.मागासलेपणाच्या निकषांत बसूनही गोरगरीब मराठा आरक्षणापासून वंचित राहिला..आता मराठा समाजाचा तारणहार म्हणून मनोज जरांगे-पाटील यांच्या चळवळीचा उदय झाला.ही चळवळ निर्णायक वळणावर पोहोचली आहे म्हणूनच.. शाब्बास मनोज जरांगे-पाटील!
वाचा माझे दर शुक्रवारी प्रकाशित होणारे “राजपाट” हे सदर.सोबत उन्मेष शहाणे यांचे खास चित्र.
-राजा माने,
समूह राजकीय संपादक,
Free Press Journal व नवशक्ति, मुंबई.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
सदस्य, महाराष्ट्र शासन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, समिती.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट