Latest Marathi News

BREAKING NEWS

लॉकडाऊन काळातील गाळेभाडे नगरपरिषदांनी माफ करावे! महिला राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0

करमाळा : महिलाराष्ट्रवादीकॉंग्रेसने करमाळा नगरपरिषेदेला लॉकडाऊन कालावधीतील गाळेभाडे त्वरित माफ करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केला. त्या कालावधीत सर्व नगरपरिषदेचे गाळे बंद होते.

गाळेधारकांचे उत्पन्नाचे साधन बंद असल्यामुळे या कालावधीत सर्व गाळेधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या लॉकडाऊन कालावधीत सर्व गाळेधारकावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने महिला राष्ट्रवादी करमाळा शहराध्यक्षा सौ .राजश्री कांबळे, महिला सोलापूर ज़िल्हा उपाध्यक्षा सौ.जयमाला चवरे, करमाळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा सौ . नलिनी जाधव, तालुका सरचिटणीस सौ.शांता जाधवर , शहर सरचिटणीस सौ.साधना खताळ, सौ. नंदिनी लुंगारे, व रुपाली चवरे यांच्या उपस्थितीत करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांना गाळेभाडे माफ करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.