सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा ; चंद्रकांत दादा पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांची संवाद
पुणे |
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि मुक्त संवाद कार्यक्रमात सहभागी होऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न असल्याची भूमिका स्पष्ट केली.
चंद्रकांतदादा पाटील बोलताना म्हणाले की, माझ्या पाहण्यातील वाचन करणाऱ्या नेत्यांबद्दल बोलताना स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वाचन मोठ्या प्रमाणात होते. ते वाचनासाठी वेळ कसा काढतात, याचेही आश्चर्य वाटायचे. सध्याच्या नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाचन खूप आहे. अलिकडच्या काळातील संदर्भही त्यांच्या भाषणात येत असतात. माझ्या वाचनाबद्दल विचारले असता आपल्या वाचनाची सुरुवात ज्ञानेश्वरीपासून झाल्याचे नम्रपणे सांगितले.
या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र उपस्थित होते.