Latest Marathi News

BREAKING NEWS

रायगडमधील संशयित बोटप्रकरणी पुढील तपासासाठी NIA टीम दाखल

0

 

रायगड | रायगडच्या हरिहरेश्वर जवळ एक अज्ञात बोट आढळली . इतकंच नाही तर त्या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर संपूर्ण राज्य हायअलर्टवर गेला आहे. कोकण, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांसह सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. रायगडमधील संशयित बोटप्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एनआयएची (NIA) टीम रायगडमध्ये दाखल झाली आहे.

एनआयए टीमकडून संशयित बोटीचा तपास सुरु आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) बोट आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएस कडे वर्ग करण्यात आला होता. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहणीही केली. रायगड नजिक हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट ओमान देशातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती मिळत आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती, या बोटीतील व्यक्तींना ओमानजवळच रेस्क्यू करण्यात आलं होतं. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.