केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत मागील काही महिन्यापासून हे वाद आणखी वादात असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच जाधव यांनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. बीआरएसमध्ये प्रवेश करताच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान दिलं आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी थेट दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षानं संधी दिल्यास आपण विधानसभेची निवडणूक कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांच्याविरोधात तर लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता जालना मतदारसंघात रावसाहेब दानवेंविरूद्ध हर्षवर्धन जाधव असा सामना रंगणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
जाधवांचा बीआरएसमध्ये प्रवेश हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हैदराबादमध्ये चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. आपन लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आहेत.
नामंतरावर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नामांतरावर आक्षेप घेण्याची काही गरज नाही बॉम्बेचं मुंबई झालं तेव्हा कुणी आक्षेप घेतला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तुमचं सरकार आहे तुम्ही वाटेल ते नाव ठेवा पण जनतेला प्यायला पाणी द्या असा टोला यावेळी जाधव यांनी लगावला आहे.