Latest Marathi News

BREAKING NEWS

 रात्री झाडे कापली त्याबद्दल मी माफी मागतो! उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत 

0

 

 

मुंबई |  आरे कॉलनीमध्ये 2019 साली मेट्रो-3चे कारशेड बनवताना आवश्यक असलेली झाडे कापणे भाग होते. झाडे कापली हे खरे आहे. परवानगी घेऊन ही झाडे तोडण्यात आली, मात्र काही झाडे ही रात्रीच्या अंधारात तोडण्यात आली. त्याबद्दल मी माफी मागतो, अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केली.

 

कायदा-सुव्यस्थेवरील अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या वेळी त्यांनी राज्य सरकारची मेट्रो-3 कारशेडबद्दल भूमिका स्पष्ट केली. यापुढे कारशेडचे काम करताना एकही झाड तोडले जाणार नाही, पर्यावरणाची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

 

आरेतील आदिवासीच्या पुनर्वसनाचे काय, बिबटे, वन्यप्राणी यांचे पुनर्वसन तुम्ही कसे करणार आहात, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. इंधनावर 50 टक्के कपात करू असे म्हणणाऱया भाजपने प्रत्यक्षात इंधनात दोन टक्केच कपात केली. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांच्या दादागिरीचा मुद्दा मांडत केवळ एका आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला तीही साधी एनसी आहे. बाकीच्या आमदारांवर काय कारवाई केली, याबद्दल काहीच माहिती दिली नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.