Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

0

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

दोन दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पण गेल्या महिन्याभरापासून या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर जोरदार अॅक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गँगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिसून आलं आहे. दरम्यान, अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ‘पठाण’ चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करत “प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे..’ असं म्हंटलं आहे.

या व्हिडिओत “झुमे जो पठाण…’ हे गाणं चालू असून प्रेक्षक अक्षरशः चित्रपटगृहात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘पठाण’ पाहणारे कुठल्या जाती धर्माचे आहेत हे कळतय का? हा माझा “भारत”आहे.. प्रेमाच्या धाग्यानी विणलेला द्वेशाची तलवार चालवली तरी वीण सैल ही होत नाही तुटणे तर लांबचे. मी भारतीय आहे .’ या आशयाची पावसात त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.