Latest Marathi News

BREAKING NEWS

राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज यायला लागला ; शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टिका

0

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेची फूट सिंधुदुर्गात पडली. शिवसेना पुन्हा उभी करण्याचं काम उद्धव ठाकरे उत्तमरित्या करीत आहेत. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज यायला लागला.राणे कुटुंबीयांनी गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय दुसरं काही केले नाही, अशी टीका नाईक यांनी केली.

महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपनं आखला आहे. राज्यपालांनी अनेक वेळा शिवरायांचा अपमान केला. भाजपचे प्रवक्तेही शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचं काम करत आहेत. संयुक्त महाराष्ट्रात कोकणचा वाटा मोठा होता. उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीविषयी बोलत होते. त्यामुळं भाजपनं डाव साधत त्यांची सत्ता हिसकावून नेली, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.

विनाकारण ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. परंतु, अशा कारवाईला शिवसेना भिक घालणार नाही, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.आम्हाला कोणाचीही भीती नाही. त्यामुळं येत्या काळात आम्ही पुन्हा उभं राहू, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे येथे शासकीय मेडिकल कॉलेज मिळाले, असे म्हणत नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.