Latest Marathi News

BREAKING NEWS

राणादा पाठक बाईं लवकरच अडकणार विवाहबंधनात; केळवणाला झाली सुरुवात

0

मुंबई | तुझ्यात जीव रंगला मध्ये राणादा आणि पाठकबाईंची जोडी एकदम हिट झाली होती. त्यांच्या प्रेमकहाणीला भरभरून प्रेमसुद्धा मिळालं होतं. आता ही जोडी रियल लाईफमध्ये सुद्धा एकमेकांशी लग्न करणार आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला असून आता त्यांच्या लगीनघाईचे वेध लागले आहेत.

हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत हे नक्की असलं तरी त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल कोणताही अपडेट समोर आलेला नाही. पण या जोडीच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं मात्र समोर आलं आहे.हार्दिक आणि अक्षया यांचं पहिलं वहिलं केळवण आज पार पडलं असून अक्षयाने याबद्दल फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.

अक्षया आणि हार्दिक यांचं केळवण कोकणात पार पडलं असून दोघेही यावेळी पारंपरिक वेशात दिसून आले. हार्दिक निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तर अक्षया निळ्या साडीमध्ये दिसून आली. दोघांनी यावेळी अगदी मॅचिंग कपडे घालून कपलगोल्स दाखवून दिले आहेत.सध्या अक्षया आणि हार्दिक दोघेही वर्क फ्रंटवर बरेच ऍक्टिव्ह आहेत. हार्दिक आणि अक्षया दोघांचीही नावं बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये असणार अशा बातम्या जोर धरत आहेत. हार्दिकचं नाव तर या चर्चांमध्ये अगदी सुरुवातीपासून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.