Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

0

मुंबई | पुन्हा एकदा बळीराजाच्या अडचणी वाढणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातल्या अनेक भागात पावसाळी स्थिती आहे. काल वाशिम जिल्ह्यातील म्हसनी परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर वीज कोसळून ५ माकडांचा मृत्यू झाला तर ४ ते ५ माकडे जखमी झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पाऊस पडेल, असा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

बुलढाणा, वर्ध्यात गारपीटीसह पाऊस पडला. तर नागपूर, अमरावती, भंडा-यातही पावसानं तुफान बॅटिंग केली. या अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात आलीत, तर कोकणातील आंब्याचं नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातल्या अनेक भागात पावसाळी स्थिती आहे. काल वाशिम जिल्ह्यातील म्हसनी परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर वीज कोसळून ५ माकडांचा मृत्यू झाला तर ४ ते ५ माकडे जखमी झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पाऊस पडेल, असा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला. बुलढाणा, वर्ध्यात गारपीटीसह पाऊस पडला. तर नागपूर, अमरावती, भंडा-यातही पावसानं तुफान बॅटिंग केली. या अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात आलीत, तर कोकणातील आंब्याचं नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.