अभिनेता रजनीकांत यांचं मूळ महाराष्ट्रातील असलं तरी त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली. तामिळ चित्रपटांमध्ये सुपरस्टार ही नवी ओळख निर्माण करणारे रजनीकांत कन्नड, तेलगू, हिंदीसहीत इंग्रजी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. त्यांचा ‘शिवाजी: द बॉस’ या तामिळ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन देशभरात गाजलं. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम केला.

रजनीकांत यांचा हा विक्रम फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता तर ते आशियामधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले. रजनीकांत हे चित्रपटांबरोबर राजकारण आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या मुलीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. रजनीकांत यांच्या घरातील या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या कुटुंबियांबरोबर पोंगल (Pongal) हा सण साजरा केला. यावेळी सर्वच कुटुंबीय एकत्र होते.
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. तशी ऐश्वर्या सोशल मीडियावर फार सक्रीय असल्याने ती अनेकदा सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत चाहत्यांना खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स देत असते. असेच तीने पोंगलचे फोटो शेअर केले आहेत. ऐश्वर्याने केलेल्या पोस्टमधील फोटो हा घरातील असून त्यामध्ये ऐश्वर्या आई-वडिलांच्या म्हणजेच रजनीकांत आणि लता यांच्या पाया पडताना दिसत आहे.
ऐश्वर्या पालकांचा आशिर्वाद घेतानाचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. कारण या फोटोमध्ये रजनीकांत ज्या भिंतीसमोर उभे आहेत त्या भिंतीवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूर्णाकृती फोटो दिसून येत आहे. एका पिलरवर हा फोटो दिसत असून छत्रपती शिवाजी महाराज गडावरुन उतरतानाचं दृष्य या फोटोत दिसत आहे. या फटोची आताशी अर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे