Latest Marathi News

BREAKING NEWS

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे

0

गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर पलटवार केला. राज ठाकरे यांच्या अख्य्या भाषणावर प्रतिक्रिया द्यायची झाल्यास बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…असे होते… ते भाजपाविरोधात बोलू शकत नाहीत. त्यांनी आजवर केलेली आंदोलने निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहे, असा टोला अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की राज ठाकरे यांची आंदोलन आणि त्यांच्या भूमिकांना अर्थ नाही. आज महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मेळाव्यात मांडली. यावरही अंधारे यांनी भाष्य केले. असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना…असे त्या म्हणल्या.

मनसेने टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे बघा, त्यासाठी आंदोलन करा,असा टोलाही अंधारे यांनी लगावला. वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरेंनी बोलावे, असेही त्या म्हणाल्या.

एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवलं आणि घरात बसलेले मुख्यमंत्री बाहेर निघाले… अशी टीका राज ठाकरेंनी केली . यावर अंधारे म्हणाल्या, राज ठाकरेंनी याबाबत बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, ज्या देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेला सेना… अशी टीका केली, त्यांना तुम्ही सडेतोड उत्तरे देऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.