Latest Marathi News

BREAKING NEWS

राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

 

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी राज यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची 1 मी रोजी सभा झाली होती. मात्र या सभेसाठी राज ठाकरेंना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नोटीसमुळे राज ठाकरे यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता याप्रकरणी कलम 116, कलम 117 आणि कलम 153 अंतर्गत राज ठाकरेंविरोधात दाखल गुन्हा प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहावे असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस स्पीड पोस्टाने पाठवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.