मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमधील स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात सभा पार पडणार आहे. मात्र सभेपूर्वी एक धाकदायक वृत्त समोर येत आहे. रत्नागिरीमधील सभेला जात असताना मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे.
या घटनेमध्ये एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. देवा साळवी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ते दहीसर मनसेचे उपाध्यक्ष होते. या अपघातामध्ये अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर संगमेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या अपघाताबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे. सकाळी अपघातामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये काही जण जखमी झाले हेते, त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जेव्हा पत्र दिलं तेव्हाच का नाही प्रकल्पाची माहिती घेतली तेव्हा घरात होतात असा टोला संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आज राज ठाकरेंची सभा दरम्यान आज रत्नागिरीमध्ये राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच बारसू प्रकल्पाच्या मुद्दयावरून ठाकरे गटासह राज्य सरकारला काय तोळे लागवणार याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.