Latest Marathi News

BREAKING NEWS

राज बब्बर यांचा लेक प्रतीक पुन्हा प्रेमात, या साऊथ अभिनेत्रीला करतोय डेट

0

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) याच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. ‘बार बार देखो’ फेम अभिनेत्री प्रिया बनर्जीला प्रतीक डेट करतोय. काल प्रतीक व प्रियाने आपलं नातं ऑफिशिअल केलं. दोघांनी आपआपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट दोन सेम फोटो शेअर केलेत.

प्रतीक बब्बरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये फक्त दोघांचे टॅटू दिसत आहेत. प्रियानेही हाच सेम फोटो शेअर केला आहे. दोघांनी नाव आणि आडनावातील पहिल्या अक्षराचा म्हणजेच PB असा टॅटू काढला आहे. या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे प्रतीकने याआधी सान्या सागर या आपल्या मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधली होती.

२०१९ मध्ये दोघांचं थाटामाटात लग्न झालं. पण वर्षभरातच दोघं विभक्त झालेत. आता प्रतीक प्रियाच्या प्रेमात आहे. प्रिया बॅनर्जी ही साऊथची अभिनेत्री आहे. ‘किस’ या साऊथ चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. ऐश्वर्या रॉयसोबत जज्बा या सिनेमातही तिने काम केलं आहे. प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकलं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.